पुन्हा जीव ओतून काम करणार - राजू उंबरकर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांनी पत्रकार परिषद घेत शिवमुद्रा कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. प्रश्नउत्तराला समोर जाताना उंबरकर यांनी जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. मात्र,"जर असे झाले नसते तर येत्या काळात मतदारसंघाचा कायापालट आणि विकासात्मक बाबीने चित्र वेगळे असते". असा आशावाद मनसे चे पक्षनेते राजु उंबरकर यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. 

विजयी नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांना शुभेच्छा दिल्या, चांगल्या कामासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या सोबत राहील. एक दोन दिवसात त्यांची भेट घेऊ असेही ते म्हणाले. 

पुढं म्हणाले की,मी पुन्हा जीव ओतून काम करणार आहे, माझ्या माता भगिनींसाठी ठाम आहेत. तसेंच रुग्णसेवा कायम सुरु राहिल, रोजगारासाठी लढा सुरु राहिल. येथील प्रत्येक जन माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. म्हणून गेली २० वर्ष मी येथील माता – भगिनी, युवक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, सर्वसामान्यांच्या न्यायिक हक्कासाठी लढत आलो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक स्वबळावर लढू, लढणार नाही तर जिंकून येऊ, कारण मी रडणारा नाही तर लढणारा माणूस आहे, असे त्यांनी परिषदेत सांगितले. 

निवडणूकीत पैशाचा महापूर 
राजू उंबरकर यांनी नुकतेच पार पडलेल्या निवडणूकीवर घणाघाती आरोप करत पैशाचा महापूर झाल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुढे बोलताना म्हणाले की, आतातर राज्य त्यांचं आलं, झंडीमुंडी, कोंबड बाजार, मटका सुगंधित तंबाखू तस्करी, गल्लीबोळात फोफावणार. विविध माध्यमातून जनतेची लूट सुरू असल्याचे उंबरकर यांनी म्हटले आहे. 
मतदारांचे आभार...हा मतदारसंघ माझा परिवार आहे
सर्व मतदारांचे आभार, या निवडणुकीत माझा झालेला पराभव हा मला संपविणारा नाही. कारण आजवरच्या माझ्या इतिहासात अनेकदा मला पराभवाला सामोरे जावे लागले. या सर्व पराभवानंतर मी कधी खचलो नाही. रणांगण सोडून कधी दूर गेलो नाही. उलट पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलो. कारण हा मतदारसंघ माझा परिवार आहे,असेही ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेला मनसेचे मा. आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, महिला सेना जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष शिवराज पेचे, आजिद शेख, शुभम भोयर, संदिप वाघमारे, संतोष चिटलवार, सुमीत टुंड्रावार, मिथुन धोटे, वैभव पुराणकर, सूरज काकडे, धीरज बगवा यांच्या सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
पुन्हा जीव ओतून काम करणार - राजू उंबरकर पुन्हा जीव ओतून काम करणार - राजू उंबरकर Reviewed by सह्याद्री चौफेर on December 06, 2024 Rating: 5
Powered by Blogger.