महसूल पथकाने विनापरवाना रेतीची तीन ट्रॅक्टर पकडले

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीला कुठंतरी आळा बसावा यासाठी तहसीलदार उत्तम निलावड यांची धडक मोहीम सतत सुरु असताना देखील रेतीची अवैध वाहतूक थांबलेली दिसत नाही, आज शुक्रवारी (ता. 6) ला सकाळी 7 वा. रेतीची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले.

तालुक्यातील उपाशा नाल्यातून ते कोसरा अशी रेतीची विनापरवाना अवैध वाहतूक करणारे तिन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन हे ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात दंडात्मक कारवाईकरिता जमा केले आहे. सदरची धडक मोहीम तहसीलदार उत्तम निलावड यांच्या मार्गदर्शनात तलाठी सोयाम, कुडमेथे, सरनाईक यांनी फतेह केली. 

सदर कारवाईने मारेगाव तालुक्यात रेती तस्करी छुप्या मार्गाने होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 
महसूल पथकाने विनापरवाना रेतीची तीन ट्रॅक्टर पकडले महसूल पथकाने विनापरवाना रेतीची तीन ट्रॅक्टर पकडले Reviewed by सह्याद्री चौफेर on December 06, 2024 Rating: 5
Powered by Blogger.