सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मुकूटबन : गावातील मोकाट श्वानांचा (कुञ्यांचा) व डुकरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा, अशी मागणीचे निवेदन ग्राम पंचायत ला शुक्रवारी (ता. 6) रोजी देण्यात आले.
गेल्या काही दिवसापासुन गावामध्ये मोकाट श्वानांचा (कुञ्यांचा) वावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच डुकरांचा सुद्धा वावर वाढत चालला आहे. याचा गावातील नागरिकांना नाहक ञास सहन करावा लागत असुन काही श्वानांमुळे (कुञ्यांमुळे) रस्त्याने चालताना नागरिकांना भिती बाळगावी लागत आहे. तसेच काही ठिकाणी लहान मुलांना तसेच शाळेकरी विद्यार्थी यांना देखील ये जा करताना मनात धासगी भरत आहे. घराबाहेर पडताना सुद्धा ही भिती मनात बाळगुन बाहेर पडावे लागत आहे.
गेल्या काही दिवसापासुन यामधील काही श्वान (कुञे) हे पिसाळलेले असल्यामुळे नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण आढळताना दिसुन येत आहे. गावातील काही परिसरात डुकरांचा सुद्धा वावर वाढला आहे व याचा देखील ञास होत आहे. यामुळे मोकाट श्वानांचा (कुञ्यांचा) व डुकरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी प्रियाल पथाडे, कुणाल नागभिडकर व सचिन मुळे यांनी निवेदनातुन ग्राम पंचायत कडे केली.
गावातील मोकाट श्वान व डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 07, 2024
Rating: