सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील नगरपालीका हद्दीतील मध्यवस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय जे बंद अवस्थेत व दुर्लक्षीत आहे ते पूर्ववत सुरु करण्यासाठी नगरपालिकेनी निवेदनाची दखल घेत 6 डिसेंबर ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्व. वाचनालय मध्ये महापरीनिर्वाण अभिवादन करण्यात आले, यावेळी आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार संजय देरकर व त्याच्या प्रमुख उपस्थितीत कृती आराखडा प्रत देण्यात आली. यावेळी संजय निखाडे, शरद ठाकरे, माजी नगराध्यक्षा सुरेश रायपूरे, करुणा कांबळे, माजी नगरसेवक राजु तुरणकर, गुलाब आवारी, अनिल पिंपलकर, अशोक ठाकुरवार व सहकारी उपस्थित होते.
कृती आराखडा सुद्धा तयार करून काम सुरु करणार असे लेखी दिले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पूर्ववत करण्यात येणार सोबत रंगरंगोटी व साफसफाई करण्यात यावी व कायमस्वरुपी त्या वाचनालयाला पूर्ववत लोकांसाठी खुले करण्यात यावे. या वाचनालयाची दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यात येणार.
यावेळी बबलुभाऊ मेश्राम, प्रविण खानझोडे, धीरज पाते, रवींद्र कांबळे, किशोर मुन, पी के टोंगे, महेश टिपले, गजानन आत्राम, शेख मोहंमद अल कमल, अजय खोब्रागडे, सचिन टिपले, सूरज उपरे, दादाजी देठे, सर्व सहकारी उपस्थित होते व सर्वांनी सहकार्य केले, यावेळी विधायक कामात ज्यांनी सहकार्य त्याचे आभार रवींद्र मेश्राम यांनी मानले.
नगरपरिषदेनी घेतली दखल, शेवट डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय लोकांसाठी खुले करणार!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 07, 2024
Rating: