सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील जिल्हा परिषद कॉलनीधील रहिवाशी गोपाळ बाळकृष्ण भुसारी यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह लाखो रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना 6 डिसें.रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हा प्रकार शनिवारी सकाळी कमलाबाई भुसारी (80) यांचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना अवगत केले.
घराचे काम सुरु असल्यामुळे वृद्ध महिला कमलाबाई भुसारी ह्या शेजारच्या लहान मुलाकडे (माणिक भुसारी) रात्री थांबल्या होत्या, हिच बाब हेरून चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने असलेल्या दारातून दार तोडून आतमध्ये प्रवेश केल्याचे आढळून आले. तसेच चोरट्यांनी पळ काढण्या अगोदर किचन मध्ये चहा बनवून घेतल्याचेही निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी वृद्ध आईचे सुटकेंस मध्ये ठेवलेले 9 तोळ्याची दागिणे व 45 हजार रुपये लांबविले. व काही इतर साहित्य घरात फेकून दिल्याचे दिसून आले. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविण्यात आली.
एक्सपर्ट केली पाहणी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर यवतमाळ येथून डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी भुसारी यांच्या घराची बारकाईने पाहणी केली व घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनात वणी पोलीस करीत आहे.
जिल्हा परिषद कॉलनीत धाडसी घरफोडी; लाखोंचा मुद्देमाल लंपास
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 07, 2024
Rating: