सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तेली समाजाचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायातील थोर श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मृती निमित्त वणी मध्ये प्रेरणा यात्रा दिनांक १९/०१/२०२५ रोजी रविवारला आयोजित केले आहे. हि प्रेरणा यात्रा दिनांक १९/०१/२०२५ ला सकाळी ११:०० वाजता वणी शहरातील तेली फैल (बस स्थानक) जवळून निघणार आहे. हि प्रेरणा यात्रा वणी शहरातील प्रमुख मार्गाने निघून वणी येथील संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल च्या प्रांगणात प्रबोधनात्मक भाषणाने सांगता होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. हंसराजजी अहिर (माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री) अध्यक्ष राष्ट्रीय मागास वर्गीय आयोग यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात चंद्रपूर, वणी, आर्णी या लोकसभा मतदार संघाच्या नव निर्वाचित खासदार श्रीमती. प्रतिभा धानोरकर, मा. श्री. संजय देरकर नव निर्वाचित आमदार वणी विधानसभा, तसेच मा. श्री. बाळासाहेब मांगुळकर नव निर्वाचित आमदार यवतमाळ विधानसभा यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. संतोष ढवळे जिल्हा अध्यक्ष शिवसेना (उबाठा) अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या प्रेरणा यात्रेचे स्वागताध्यक्ष मा. श्री. नरेंद्र तराळे सेवा निवृत्त नगर परिषद अभियंता हे उपस्थित राहणार आहेत.
दिनांक १८/०१/२०२५ रोजी शनिवारला दुपारी ०३:३० वजता श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण व भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच संताजी महिला विचार मंच वणीच्या वतीने महिलांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या सर्व कार्यक्रमाला वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील तेली समाज बांधवांनी आपल्या कुटुंबासहित उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान श्री. संताजी स्मृती पर्व निमंत्रक समिती वणी, श्री. संताजी ज्ञान प्रसारक मंडळ वणी, संताजी महिला विचार मंच वणी, विदर्भ तेलीसमाज महासंघ वणी, हनुमान मंदिर देवस्थान व लाठी आखाडा वणी यांनी केले आहे.
थोर श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मृतिदिन निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 18, 2025
Rating: