सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी पोलिसांनी 18 वर्षांच्या आरोपीला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक केली आहे. बादल अनंता बेलेकार रा. साखरा असे या आरोपीचे नाव आहे. कलम 64 (2) (M) BNS सहकलम 3(1), (w), (i), 3(2), (v) अजाज अप्र का सहकलम 3(अ), 4, 5(j) (ii), 5 (L) 6 बाल. लै. अ. सं अधि. तरतुदीनुसार बेलेकार विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
सतरा वर्षांच्या मुलीवर वारंवार लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा बादल वर आरोप आहे. या अत्याचारांमुळे ही मुलगी गर्भवती राहिली आहे. पीडिता ही देखील तालुक्यातीलच रहिवासी आहे. वणी पोलीस ठाण्यात सदर गुन्हा नोंद झाला असून आरोपीला अटक करण्यात आली. SDPO सुरेश दळवे उपविभागिय पोलीस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिक तपास करत आहेत.
पीडिता ही आरोपीच्या मागील 2024 पासून ते 2025 या एक वर्षाच्या काळात तिच्यावर आरोपीने विनायक नगर येथील भाड्याच्या खोलीत वारंवार अत्याचार केले. पीडिता ही गर्भवती असल्याचे पीडितेची तक्रार आहे. वणी तालुक्यात गेल्या महिन्याभरात चोऱ्या, आत्महत्या या सारख्या घटनांमुळे चर्चेत आहे. इथे आता महिलांवरील अत्याचार वाढत चालले असून, अत्याचार आणि फसवणूक घटनांमुळे वणीकर चिंतेत सापडले आहेत.