सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : 'जागतिक आदिवासी गौरव दिन' हा दिवस जगभरातील आदिवासी लोकांच्या हक्कांसाठी आणि संस्कृतीसाठी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आहे,
या गौरव दिनानिमित्त दि.9 ऑगस्ट ला शहरामध्ये भव्य मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.
शनिवारला भीमालपेन देवस्थान, वणी येथुन दुपारी 4 वाजता आदिवासी समाज बांधव यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅली काढून वणी शहरामध्ये फिरुन भीमालपेन देवस्थान येथे समारोप होईल.
तरी समस्त आदिवासी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी समाज बांधवांनी केले आहे.