सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष ॲड.. कुणाल विजय चोरडिया यांचेवर भारतीय जनता पार्टीने आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
भाजप युवा मोर्चा व उत्तर भारतीय आघाडीच्या यवतमाळ जिल्हा प्रभारीपदी ॲड. कुणाल चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती खुद्द ॲड. कुणाल चोरडिया यांनी दिली.
नुकतेच जिल्हा उपाध्यक्षपदी निवड आणि आता त्यांचेवर भाजप युवा मोर्चा तसेच उत्तर भारतीय आघाडीचे यवतमाळ जिल्हा प्रभारी पद सोपविल्याने त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण यांचे विशेष आभार मानले व मिळालेली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडून पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल वणी शहरासह वणी विधानसभा क्षेत्रात भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.