सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील प्रेम नगर झोपडपट्टी परिसरात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (Prevention of Immoral Trafficking Act) लक्ष्मी दिपचंद शिसोदिया (वय 45) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. हा गुन्हा दि. 09/08/2025 रोजी 23:08 वाजता नोंदवण्यात आला.
पोलीस निरीक्षक उमेश खुशालराव बेसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ‘फ्रीडम फर्म’ या संस्थेच्या स्वयंसेवकांनी माहिती दिली की, लक्ष्मी शिसोदिया या प्रेम नगर झोपडपट्टी परिसरात वेश्या व्यवसाय चालवतात. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) वणी यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर पोलीस स्टाफ सह सापळा रचला.
पोलिसांनी 'XYZ' नावाच्या एका 30 वर्षीय व्यक्तीला पंटर म्हणून लक्ष्मी शिसोदिया यांच्याकडे पाठवले. ठरलेल्या संकेतानुसार, पंटरने पोलिसांना संपर्क केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी लक्ष्मी शिसोदिया तेथे आढळून आल्या. पोलिसांनी शिसोदिया यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे 300 रुपये (100 आणि 200 रुपयांच्या नोटा) मिळाले.
तसेच, घटनास्थळी 22, वर्षीय पीडित महिलाही आढळून आली. पोलिसांनी तिची चौकशी केली असता, लक्ष्मी शिसोदिया यांनी तिला धमकावून वेश्या व्यवसायात ढकलल्याचे तिने सांगितले.
या प्रकरणी आरोपी लक्ष्मी शिसोदिया यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, कलम 143, 144 (2) व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3, 4, 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर करत आहेत.