टॉप बातम्या

वणी विधानसभा सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुखपदी साकेत भुजबलराव यांची निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली व आमदार संजय देरकर (वणी विधानसभा क्षेत्र) यांच्या आदेशानुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात वसंत जिनिंग येथे दिनांक 09/08/25 शनिवार रोजी आयोजित नवनियुक्त पदाधिकारी पदभार मेळावा संपन्न झाला. यामध्ये साकेत अविनाश भुजबलराव यांची वणी विधानसभा (वणी, झरी व मारेगाव) सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती करून पदभार मा.आमदार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.  

पक्षाची डिजिटल ताकद वाढवणे, पक्षाची जनतेशी अधिक सशक्त नाळ जोडणे आणि पक्षाच्या विचारांचा ठसा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या मुल मंत्रानुसार ही जबाबदारी साकेत भुजबलराव यांचेकडे मोठ्या विश्वासाने सोपविण्यात आलेली आहे. साकेत भुजबलराव ह्यांची सोशल मीडियावरील प्रभावी पकड, प्रचार व प्रसार यामुळेच त्यांच्यी नियुक्ती करण्यात आली, नियुक्तीचे संपुर्ण श्रेय ते आमदार संजय देरकर, जिल्हाप्रमुख संजय निखाडे, वणी विधानसभा प्रमुख सुनिल कातकडे, उपजिल्हाप्रमुख दिपक कोकास यांना देतात. त्यांच्या निवडीबाबत वरिष्ठासह तिन्ही तालुका, उपतालुका प्रमुख,शहर प्रमुख यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी कामगार सेनेचे नेते तथा राज्य कार्याध्यक्ष अविनाश भुजबलराव, युवासेना उपजिल्हा प्रमुख अंजिक्य शेंडे, शहर सचिव अजय चन्ने, गणपतभाऊ लेडांगे, सामित भुजबलराव, राहुल कोलते तसेच शिवसेना व युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित विधानसभा प्रसिद्धी प्रमुख साकेत भुजबलराव माध्यमाशी बोलताना म्हणाले की,आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली "माझ्या वर सोपवलेली जबाबदारी मी अतिशय प्रभावीपणे वणी विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या विचारांचा व कार्याचा प्रसार करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे."

Post a Comment

Previous Post Next Post