टॉप बातम्या

भाजपच्या किसान मोर्चा तालुका अध्यक्षपदी पवन ढवस यांची निवड


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी तालुक्यातील नवीन कार्यकारिणीची फौज तयार करून त्या पदाची नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम सुरु केला आहे. पवन ढवस यांची किसान मोर्चा तालुका अध्यक्ष या पदावर नियुक्ती घोषित करून नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.  
श्री पवनभाऊ ढवस यांची भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्या बदल भाजप चे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
नियुक्तीनंतर पहिली प्रतिक्रिया देताना पवन ढवस म्हणाले, मारेगाव तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना सरकार च्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचला पाहिजे. त्यांनी विशेष म्हणजे पीएम किसान योजनेवर भर देऊन जास्तीतजास्त शेतकऱ्यांना यात जोडणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना सरकार च्या योजनांचा प्रसार करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे,असंही ते म्हणाले.



Post a Comment

Previous Post Next Post