सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : मृत्यूमुखी पडलेल्या वाघाची नख व दात चोरी करणाऱ्या संशयित चौघांना वन विभागाने अटक केली. नागेश विठ्ठल हिरादेव (वय 40, रा.उकणी), रोशन सुभाष देरकर (वय 28, रा. उकणी),आकाश नागेश धानोरकर (वय 27,रा. वणी), व सतीश अशोक मांढरे (वय 26, रा. वणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे चारही आरोपी वेकोली निलजई कोळसा खान मध्ये कामगार असल्याची माहिती आहे.
वणी तालुक्यातील उकणी येथील खुल्या कोळसा खाणीच्या बोअरवेलजवळील डिपीनजीक मंगळवारी 7 जाने. रोजी तीन ते चार वर्षे वयाचा हा वाघ मृतावस्थेत आढळला. वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. या वाघाचा मृत्यू 10 ते 12 दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी वर्तविली होती. या वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला की, त्याची शिकार करण्यात आली. याबाबत वनविभागाकडून अमरावती, यवतमाळ, पांढरकवडा व वणी येथील पथक तयार करून कसून तपास केला गेला. या वाघाचा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, वाघाचे नखे व जबड्यातील मुख्य दात गायब करण्यात आल्याने या दृष्टीने तपास सुरू केला असता वाघाचे दात व नख चोरून नेणाऱ्या चार संशयित आरोपीना वन विभागाने अटक करून आज शुक्रवारी कोर्टात हजर केले असता त्यातील दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर दोघांना वन विभागाची कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या दोघांना जामिनावर सोडण्यात आले अशी माहिती आहे.
वनविभागच्या कोठडीतील आरोपीचा आत्महत्या प्रयत्न
मृतावस्थेत आढळलेल्या वाघाचे दोन मुख्य दात आणि 12 नखे गायब असल्याने वाघाचा मृत्यू नैसर्गिक आहे की त्याची शिकार करण्यात आली, याचा शोध वनविभागाने सुरू केला. आणि चार आरोपीना ताब्यात घेतलं होत. काल न्यायालयात त्यांना हजर केले होते दोघांना न्यायालयीन कोठडी तर दोघांना वन विभाग कोठडी सुनावली होती त्यातील नागेश विठ्ठल हिरादेव या आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला, ही बाब वनविभागाच्या लक्षात येताच त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढे हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
वाघाची नख व दात चोरी करणाऱ्या चौघांना वन विभागाने केली अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 18, 2025
Rating: