आमदार संजय देरकर यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नांदेपेरा ग्रामपंचायत अंतर्गत घेण्यात आलेल्या शिपाई भरती परिक्षेत झालेला घोळ व अन्यायाचा विरोधात आमरण उपोषण सुरु करण्यात आले. आज शुक्रवार, (ता.17) उपोषणाचा तिसरा दिवस होता, मात्र तीन दिवस लोटूनही प्रशासनाने उपोषण स्थळी भेट दिली नाही. त्यामुळे आमदार संजय देरकर यांनी उपोषण मंडपी भेट देऊन त्या उपोषणकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर सदर उपोषण नारळपाणी पिऊन सोडण्यात आले. 

मागील तीन दिवसापासून वणी तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत अंतर्गत शिपाई भरती परिक्षेत झालेला घोळबाबत परीक्षार्थी तालुका जिल्हा वरिष्ठा कडे निवेदन सादर केले होते. त्यामध्ये  दिनांक ३०-१२-२४ रोजी झालेली शिपाई भरती रद्द करुन फेरपरीक्षा घेण्यात यावी, परिक्षेत घोळ करणाऱ्यां संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, शिपाई पद भरती परिक्षेतील सिसिटिव्ही फुटेज देण्यात यावे, लेखी परीक्षा झाल्यानंतर तोंडी परीक्षा घेण्यात यावी व नंतर निवड करण्यात यावी, परिक्षा घेणारे अधिकारी बि.एन.जाधव यांचे दिनांक २७-१२-२४ ते २-१-२५ पर्यंत मोबाईल डाटा व काॅल डिटेल्स चेक करण्यात यावे, या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले होते. आज उपोषणाचा तिसरा दिवस होता. सायंकाळी ५.३० वाजता आमदार संजय देरकर यांनी उपोषण मंडपाला भेट घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून परीक्षार्थिना आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण नारळ पाणी पिऊन मागे घेण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमख संजय निखाडे, शरद ठाकरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, सुरेश शेंडे शिवसेना शाखा प्रमुख नांदेपेरा, सुधीर थेरे शहर प्रमुख वणी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे, राजु तुरणकर माजी नगसेवक, मंगल भोंगळे, रुद्रा कुचनकर, अभिनंदन भेंडाळे, संजोग झाडे, साहील ठमके, तुषार खामनकर, पवन कोडापे आदींची उपस्थिती होती.
आमदार संजय देरकर यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे आमदार संजय देरकर यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे Reviewed by सह्याद्री चौफेर on January 17, 2025 Rating: 5
Powered by Blogger.