घरकुलासाठी रेती उपलब्ध करून द्या -उपसरपंच सचिन रासेकरांचे प्रशासनाला निवेदन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : प्रधानमंत्री आवास, मोदी आवास, शबरी व रमाई घरकुल योजनेतील प्राप्त लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्या, अशी मागणी उपसरपंच सचिन रासेकर (ग्रामपंचायत मोहदा) यांच्या नेतृत्वात शुकवार, 17 जाने. रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विविध योजनेमार्फत गोरगरीब मागासवर्गीय लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच त्यांना राहण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, अनुसूचित जातीकरिता रमाई आवास योजना व अनुसूचित जमातीसाठी शबरी आवास योजना अशा विविध योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये मोहदा येथील गरजूंना घरकुल प्राप्त झाले. घरकुल बांधकामाकरिता लागणारे साहित्य म्हणजे वाळू हा खूप महत्वाचा घटक आहे आणि ते उपलब्ध होत नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे कामे वाळू अभावी अर्धवट व नवीन घरकुल प्राप्त लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्यामुळे बांधकाम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याची योजना चालु केली असता, नव्याने घरकुल प्राप्त लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्यामुळे काम बंद करावे लागत आहे. असे निवेदनातून म्हटलं आहे.
त्याकरिता घरकुल लाभार्थ्यांना तत्काळ शिंदोला येथील वाळू डेपो चालु करून वाळू उपलब्ध करून द्या,अशी मागणी तालुका प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना असंख्य मोहदा ग्रामवासी तथा घरकुल लाभार्थी यावेळी उपस्थित होती. 

    
घरकुलासाठी रेती उपलब्ध करून द्या -उपसरपंच सचिन रासेकरांचे प्रशासनाला निवेदन घरकुलासाठी रेती उपलब्ध करून द्या -उपसरपंच सचिन रासेकरांचे प्रशासनाला निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on January 17, 2025 Rating: 5
Powered by Blogger.