टॉप बातम्या

गवंडी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : बांधकाम कारागिराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरालगत खरबडा मोहल्ला येथे आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. 

अमोल पुंडलिक वरभे (40) रा. तळेगाव (जिल्हा वर्धा) ह मु. खळबडा मोहल्ला,असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

शेजाऱ्यांच्या माहितीवरून पोलीस त्या ठिकाणी पोहचून घटनेचा पंचनामा केला व वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतक अमोल हा गवंडी कामगार म्हणून काम करत असल्याचे समजते. तो काही दिवसापासून भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याने घरात स्वतःला इहलोकाची यात्रा केली. त्याच्या आत्महत्या मागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
Previous Post Next Post