टॉप बातम्या

चोपन येथील नागरिकांचे विविध विभागाला निवेदन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 
 
मारेगाव : चोपण येथील एफ क्लासची गायरान असलेली जमीन ही सोलर उत्पादन करणाऱ्या कंपनीला देण्यात येऊ नये. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा चोपण येथील नागरिकांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.

चोपण येथे एफ क्लासची 8 हेक्टर 94 आर एवढी पडीत जमीन आहे. त्यापैकी 80 आर एवढ्या जमिनीवर स्मशानभूमी दाखवलेली आहे. उर्वरित जागा ही गायरान म्हणून आहे. येथे गावातील जनावरेचारतात. मुले खेळतात, जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी तलाव सुद्धा खोदण्यात आला होता. परंतु ही जमीन चोपण ग्रामपंचायतने गावातील नागरिकांना कसल्याही प्रकारे विश्वासात न घेता सोलर वीज निर्माण करणाऱ्या कंपनीला 30 वर्षासाठी लीजवर दिली आहे.

गावातील जमीन एका कंपनीला दिल्यानंतर जेव्हा कंपनीवाले ती जमीन मोजण्यासाठी आले तेव्हा गावातील नागरिकांना याविषयी माहिती मिळाली. तेव्हा गावातील गंगाराम बुवा देवस्थान चोपणचे सभामंडपात दि. 15 मार्चला रात्री ८ वाजता दत्तुजी महीपत खिरटकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यात चोपण येथील सरकार एफ क्लासची वर्ग 2 ची 8 हेक्टर 94 आर ही जमीन सध्या ग्रामपंचायतच्या देखभालीमध्ये असून तेथे गायरान किंवा जनावरे चारण्यासाठी ती जागा आरक्षित केलेली होती. या जमिनीवर सामाजिक वनिकरण अंतर्गत वृक्षारोपण केलेले होते. तसेच या जमिनीवर येथील जनावरांना पिण्यासाठी तलाव सुद्धा ग्रामपंचायत अंतर्गत केलेला आहे. या जमिनीबाबत ग्रामपंचायतने गावातील नागरिकांची कोणतीही आमसभा न भरवता आणि विश्वासात न घेता खासगी कंपनीला चोपण येथील जमीन दिली. या सर्वे नंबरला लागून असलेले शेतकरी यांना मोजणीचे कोणत्याची प्रकारचे नोटीस न बजावता मोजणी केली आहे. व त्यांच्या शेतात जाण्याकरिता रस्त्याची त्यांना अडचणी निर्माण होऊ शकते. त्यांना शेतात जाण्याकरिता कोणताही दुसरा मार्ग नाही.चोपन येथे एफ क्लासच्या जमिनी शिवाय दुसरी कोणतीही जमीन नाही. चोपन येथील मुलांना खेळण्यासाठी एकही मैदान नाही. हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये येथील मुले या जमीनीवर असलेल्या खुल्या ग्राउंड वरतीच खेळत असतात आणि व्यायाम सुद्धा येथेच करतात. तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याची दुसरी कोणतीही व्यवस्था नाही, तसेच वृक्षारोपण करण्यासाठी दुसरी कोणतीही जागा उपलब्ध नाही.

चोपन हे शेतकऱ्यांचे गाव आहे. येथील नागरिकांचा प्रथम व्यवसाय हा शेती असून येथे दरवर्षी पोळा भरला जातो. चोपन येथील मुख्य चौकात जागा अपुरी असून पर्यायाने हीच जागा पोळा भरवण्यासाठी योग्य ठरू शकते. त्यामुळे ही जर जागा दुसऱ्याला लीज वर दिली तर चोपन येथील पोळा भरण्यास सुद्धा समोर अडचणी निर्माण होईल. त्यामुळे ही जमीन कोणालाही लीजवर देण्यात येऊ नये. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला. निवेदन देतांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंता आसुटकर,दत्तू खिरटकर,प्रमोद मसाळकर,वीजय खिरटकर, नंदेश्वर आसुटकर, प्रशांत पावडे, प्रफुल क्षीरसागर, प्रशांत आसुटकर, नितेश आसुटकर, दीपक खिरटकर, संदीप खिरटकर, विठ्ठल कुळसंगे, सूर्यभान आडकिने, पंकज खिरटकर, मनोज चिंचोलकर, तेजस देऊळकर, संदीप देऊळकर, महादेव सारवे, सुजल बोढाले,मयूर बावने यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();