टॉप बातम्या

घरात तीन दिवसांपासून असलेला नाग अखेर सर्पमित्रांनी पकडला

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी-जामणी : यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यातील माथार्जून गावातील मारुती कुरसंगे यांच्या घरात गेल्या तीन दिवसांपासून एक विषारी नाग लपून बसल्याने कुटुंबासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर आज सर्पमित्रांना याची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षितरीत्या नागाला पकडले.

सर्पमित्र नागेश तुटेवार व त्यांचे सहकारी रेहान खान यांनी अत्यंत दक्षतेने रेस्क्यू मोहीम राबवत नागाला कोणतीही इजा न करता पकडले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. त्यानंतर पकडलेल्या नागाला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या धाडसी आणि तत्पर कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी सर्पमित्रांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. तसेच पावसाळ्याच्या काळात साप घरात किंवा परिसरात आढळल्यास घाबरून न जाता किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्र अथवा वन विभागाशी संपर्क साधून सुरक्षितरीत्या रेस्क्यू करून घ्यावे, असे आवाहन सर्पमित्रांनी केले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();