टॉप बातम्या

मच्छिंद्रा शाळेच्या विद्यार्थ्याची नवोदयमध्ये निवड


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मच्छिंद्रा येथील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी प्रफुल संजय वडस्कर याची नवोदय विद्यालय, बेलोरा येथे निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला.

यावेळी प्रफुल तसेच त्याच्या आई-वडिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षक व शाळा व्यवस्थापनाने त्याच्या यशाबद्दल अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रफुलच्या या यशामुळे शाळेच्या नावाला मानाचा तुरा मिळाला असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही तो प्रेरणादायी ठरला आहे. त्याचे या यशा बद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन व सह्याद्री चौफेर टीम च्या वतीने शुभेच्छा...!!
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();