उल्लेखनीय...! आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : दि.१७ जाने. २०२५ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरुळ येथे वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजयभाऊ देरकर यांच्या वाढदिवसानिमित्य सामजिक कार्यकर्ते अतुल वटे, शितल पोटे माजी सभापती- पं-स-मारेगांव, सरपंच प्रमोद आत्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर गेडाम, श्रीराम ठेंगणे अभिराज भोयर, जिवन वैद्य, राजु जेनेकर यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला कार्यकर्ता मंडळी, व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या संगिता टोंगे, रंजना टोंगे, अमृता घुगुल, निता राजूरकर, पंचफुला वाघमारे, वंदनाताई बल्की, स्वाती कोरझरे, मुख्याध्यापक डी डी ताजने, शिक्षक जी जी राऊत व बंडु लाडसे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


आजच्या या युगात वाढदिवसावर लोक लाखो रुपये खर्च करतात. पण, मंगरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व भेट देऊन साजरा केला आहे.त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उल्लेखनीय...! आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उल्लेखनीय...! आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on January 19, 2025 Rating: 5
Powered by Blogger.