टॉप बातम्या

जब मिल बैठे तीन यार... रवी, अविनाश आणि कार्यकर्ता!


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : आगामी नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मारेगावमध्ये संघटनात्मक तयारीला जोरदार सुरुवात केली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीची महत्त्वपूर्ण जबाबदारी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र बेलूरकर यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर पक्ष संघटना अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे पक्षाची ताकद वाढली असून बूथस्तरापासून संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे. आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला भक्कम यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे.

राजकीय वर्तुळात सध्या "रवी, अविनाश आणि कार्यकर्ता" ही यशस्वी फळी चर्चेचा विषय ठरत आहे. रवींद्र बेलूरकर यांचे नियोजन, अविनाश लांबट यांचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची मेहनत यांच्या जोरावर भाजपाने निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरुवात केली असून आगामी नगरपंचायत, पंचायत समिती असो की जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्ष दमदार कामगिरी करेल, असा विश्वास भाजप पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();