टॉप बातम्या

विरोधकांच्या उरात धडकी; आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील राजकारणाला नवे वळण देणाऱ्या घडामोडीत काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे दयाल रोगे तसेच शिवसेना (शिंदे गट) चे गोविंदा निखाडे यांनी आपल्या शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार आणि जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा भाजप तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या पक्षप्रवेशामुळे मारेगाव तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. यावेळी मंचावर जिल्हा पदाधिकारी माधव कोहळे, मंगेश देशपांडे, शंकर लालसरे, ज्ञानेश्वर चिकटे तसेच तालुका पदाधिकारी प्रशांत नांदे, अनुप महाकुलकर, दीपिका रस्से, वैभव पवार आणि रमण डोये उपस्थित होते.

दीर्घकाळ काँग्रेसमध्ये सक्रिय राहिलेले मारोती गौरकार यांच्यासह विविध पक्षांतील प्रभावी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशाला तालुक्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण मानले जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.

यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मारोती गौरकार म्हणाले, "केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मोठ्या ताकदीने काम करणार आहोत. हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे."

गौरकार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले असून आगामी काळात विविध पक्षांतील अनेक नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे संकेत भाजप तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी दिले. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कार्यक्रमाला प्रसाद ढवस, गणेश खडसे, विजय खिरटकर, सुनील देऊळकर, पांडुरंग उंबरकर, शोभा नक्षणे, सुनीता पांढरे, माला गौरकार, नंदा थेरे, मनीषा बोढाले, शालिनी दारुण्डे, राहुल राठोड, पवन ढवस, अनिकेत चोपने, आशिष खंडाळकर, प्रभाकर घोटेकर, दिलीप आत्राम, प्रवीण नान्हे, चंदू जवादे, तात्याजी चिकटे, गणेश कळसकर, गणेश गुंडावार, लीलाधर काळे, चंद्रकांत धोबे, मधू टोंगे, मारोती तुरानकर, बबन झोटिंग, गणपत वराटे, अजय वासेकर, दादाराव ठोबरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();