टॉप बातम्या

महिनाभरापूर्वी विवाहबद्ध झालेल्या दाम्पत्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील सगणापूर परिसरात नवविवाहित दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मृतांमध्ये आशिष रमेश धानोरकर (24) आणि करिष्मा आशिष धानोरकर (22) यांचा समावेश आहे. आशिष हा रोजमजुरीसह कॅटरिंग व्यवसायात काम करत होता. त्याच ठिकाणी करिष्माही कामासाठी येत असल्याचे समजते.

या दरम्यान, दोघांमध्ये ओळख निर्माण होऊन 4 मे 2026 रोजी वणी येथे दोघांचा विवाह संपन्न झाला होता. सोमवारी सायंकाळी ते घराबाहेर पडले. मात्र, काही वेळानंतर सगणापूर शिवारातील एका विहिरीत दोघांचेही मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.

लग्नाला अवघा महिना पूर्ण होत असताना घडलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे सगणापूरसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();