सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
या प्रकरणात नांदेपेरा रोडवरील वरलक्ष्मी ट्रान्सपोर्ट या नावावरील अॅक्सिस बँकेतील खाते सायबर गुन्ह्यांमधील कथित 'म्युल बँक अकाउंट' म्हणून वापरल्याच्या संशयावरून वणी पोलिसांनी नांदेपेरा येथील दोन खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या National Cyber Crime Reporting Portal (NCRP) आणि SAMANVAY Portal वरील माहितीच्या विश्लेषणादरम्यान वणीतील अॅक्सिस बँकेच्या व्यंकटेश मंदिर शाखेतील एका खात्यात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत हे खाते वरलक्ष्मी ट्रान्सपोर्ट या नावाने असून त्याचे खातेधारक गणेश नंदकिशोर गोहोकर आणि पवन साधुजी चाहाणकर असल्याचे समोर आले. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

