टॉप बातम्या

गावागावात फडकणार शिवसेनेचा भगवा; संघटन विस्तारासाठी विजय चोरडिया यांचा निर्धार

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : वणी तालुक्यात शिवसेनेच्या संघटन विस्ताराला गती देण्यासाठी गावागावात नव्या शाखा स्थापन करण्याचा निर्धार शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांनी व्यक्त केला. त्याच अनुषंगाने तालुक्यातील रासा येथे मंगळवारी (दि. २२ जुलै) शिवसेनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विजय बाबू चोरडिया यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नव्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करून त्यांचा सत्कारही करण्यात आला.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना विजय बाबू चोरडिया म्हणाले की, शिवसेनेची विचारधारा तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटन अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. वणी तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेच्या शाखा स्थापन करून संघटना अधिक बळकट करण्यात येणार असून, प्रत्येक पदाधिकाऱ्याने जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच समाजहिताची कामे, सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करणे आणि शिवसेनेच्या माध्यमातून विकासाभिमुख उपक्रम राबविणे ही प्रत्येक शिवसैनिकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला दीपक कोकास, सुधाकर गोरे, किशोर नांदेकर, प्रसाद ठाकरे, शिवराज पेचे, शुभम गोरे, धीर राजूरकर, राहुल पारखी, हिमांशु बोहरा, अनिल ढगे, अमृत पुरी, कपिल कुंटलवार, प्रज्योत ठावरी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी नव्याने स्थापन झालेल्या शाखेच्या माध्यमातून जनसेवा, समाजहित आणि शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();