टॉप बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी मारेगाव येथील शेतकरी सुविधा हॉल मध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सामाजिक उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुकाच्या वतीने करण्यात येत असून, या शिबिरात १०० रक्ताच्या बाटल्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

रक्तदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश आहे.

या शिबिरासाठी मारेगाव सह ग्रामीण परिसरातील नागरिक, युवा वर्ग, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्याने आपल्या मित्रपरिवार व नातेवाईकांनाही रक्तदानासाठी प्रेरित करून या सामाजिक कार्यात सहभागी करून घ्यावे, विशेष म्हणजे शिबिरात प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेट देण्यात येणार आहे.


"रक्तदान करा... जीवनदान द्या!" या संदेशासह हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांनी केले आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();