टॉप बातम्या

बच्चू कडू यांचा वणी दौरा पुढील आदेशापर्यंत स्थगित


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : विधानपरिषद आमदार मा. बच्चूभाऊ कडू यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे रविवार, दिनांक १९ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला त्यांचा वणी दौरा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे.

शेतकरी मंदिर, वणी येथे दुपारी ३ वाजता शिवसेना व प्रहार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कामगार व नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, बच्चूभाऊ कडू यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा आणि मेळावा सध्या रद्द करण्यात आला असून, नव्या तारखेची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

याबाबत सर्व नागरिक, शेतकरी, कामगार, युवक व महिलांनी याची नोंद घ्यावी आणि पुढील तारखेची अधिकृत घोषणा होईपर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();