टॉप बातम्या

कोल डेपोच्या प्रदूषणाविरोधात लालपुलियावर रास्ता रोकोलवकर कारवाई न केल्यास आमरण उपोषण


सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : चिखलगाव येथील परिसरातील कोल डेपोमुळे होणारे प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात गुरुवारी नागरिकांनी लालपुलिया चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. दुपारी ११ ते १ या वेळेत झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते.
२०२५ पासून वारंवार निवेदने आणि पाठपुरावा करूनही कोल डेपोविरोधात ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. कोळशाच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, डोळ्यांचे व त्वचेचे आजार वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली. अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. यावेळी नायब तहसीलदार विवेक पांडे यांना निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या नो ऑपरेशन आदेशाची अंमलबजावणी, नियमबाह्य कोल डेपो बंद करून सील करणे, अवैध कोळसा साठा जप्त करणे तसेच ओव्हरलोड वाहतूक रोखण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, महावितरणचे अधिकारी एकरे यांनी नव्याने प्राप्त झालेल्या २७ कोल डेपोच्या वीजजोडण्यांबाबत ग्राहकांची ओळख निश्चित करून चार दिवसांत वीजजोडण्या खंडित करण्याचे आश्वासन दिले. तर नायब तहसीलदार पांडे यांनी संबंधित मागण्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले.

या आंदोलनात नीलेश सोनटक्के, अमित संतें, प्रदीप खेकारे, संकेत काळे, शैलेश आत्राम, रवी महतो, मनोज ढेंगळे, शेखर सातपुते, अविनाश किनाके, सागर जाधव, ज्योती मोहितकर, सुचिता पाटील, सुचिता भगत, विद्या काळे, प्रिया संते, प्रभावती सोनटक्के, रिंकू महाकुलकर आणि मेघा देशपांडे यांच्यासह स्माईल फाउंडेशन, रामदेव बाबा मूकबधिर विद्यालय, चिखलगाव, बिरसा मुंडा समाज संघटना, लोहार समाज संघटना, प्रहार संघटना तसेच चिखलगावातील समस्त नागरिकांनी सहभाग नोंदवून नागरिकांची भूमिका मांडली.
चार दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास पोलिस ठाण्यात सामूहिक तक्रार दाखल करून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सामूहिक उपोषण करण्याचा इशारा लालपुलिया संघर्ष समितीने दिला आहे.

दिलेल्या मुदतीत मागण्यांची पूर्तता करून प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली नाही, तर लवकरच वणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर किंवा यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समिती आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात येईल.

 -नीलेश सोनटक्के 
अध्यक्ष लालपूलिया संघर्ष समिती.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();