टॉप बातम्या

रंगभूमी दिन निमित्य ज्येष्ठ नाट्यकलावंत गणपतराव अतकारे यांचा विशेष गौरव

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सागर झेप बहुउद्देशीय संस्था, वणीच्या वतीने ज्येष्ठ नाट्यकलावंत गणपतराव अतकारे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन विशेष गौरव करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष सागर मुने व नाट्यकलावंत तसेच बालनाट्य कलावंतांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि सन्मानचिन्ह देऊन गणपतराव अतकारे यांचा रंगभूमीतील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

या सत्कारप्रसंगी संस्थाध्यक्ष सागर मुने, राजू खुसपुरे, शैलेश अडपवार, अशोक सोनटक्के, प्रवीण सातपुते, कान्हा खुसपुरे, सीमा सोनटक्के, मीना वानखेडे, माही खुसपुरे आणि प्रिया कोणप्रतिवार उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();