टॉप बातम्या

वणी पोलिसांची धडक कारवाई : धारदार सत्तूरसह संशयित आरोपी जेरबंद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वणी पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत आणखी एक यश मिळवले आहे. रंगारीपुरा परिसरात सार्वजनिक ठिकाणी धारदार लोखंडी सत्तूर बाळगून फिरणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्याविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (दि. १५ जून) रोजी वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या आदेशानुसार पोलीस पथक रंगारीपुरा परिसरात गस्त घालत होते. यावेळी एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीरपणे धारदार लोखंडी सत्तूर आढळून आला.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सदर घातक शस्त्र जप्त केले. चौकशीत आरोपीचे नाव महेश रमेश मोहबिया (वय ३५ वर्षे, रा. रंगारीपुरा, वणी) असे निष्पन्न झाले. सार्वजनिक ठिकाणी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो हे शस्त्र बाळगत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक साजिद सैय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन सावसाकडे, नायक पोलीस कॉन्स्टेबल विशाल राठोड तसेच आकाश अवचारे, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम आणि नंदकुमार पुप्पलवार यांनी केली.

आरोपीविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात आणि गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी अशाच प्रकारच्या कडक कारवाया यापुढेही सुरू राहतील, असा इशारा वणी पोलिसांनी दिला आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();