सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
झरी-जामणी : तालुक्यातील मार्की येथे एका खानावळ चालकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चेला उधाण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आझाद उदकवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात लाकडाने वार करून त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व अन्य आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आल्या असून संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.
दरम्यान, ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, तसेच आरोपी कोण आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून पुढील तपासानंतरच हत्येमागील कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे वणी उपविभागीय क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.