टॉप बातम्या

जलशुद्धीकरण केंद्रातील ३० वृक्षतोडीला पत्रकार संघटनेचा विरोध

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : नगर परिषद वणीच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील ३० वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावाला न्युज मिडीया पत्रकार असोसिएशनने तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना आक्षेप अर्ज सादर करून वृक्षतोडीचा निर्णय तत्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली.

संघटनेने म्हटले आहे की, कडूलिंब, वड, जांभूळ, आंबा, आवळा यांसारखी अनेक वर्षे जुनी वृक्षसंपदा परिसरातील पर्यावरण संतुलित ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वृक्षतोड झाल्यास पक्ष्यांचे अधिवास नष्ट होऊन पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

विकासकामांसाठी वृक्षतोड हाच एकमेव पर्याय नसून नगर परिषदेकडे उपलब्ध असलेल्या पर्यायी जागांचा विचार करावा, अशी मागणी संघटनेने केली. अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही वृक्षतोड न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 

निवेदनावेळी संघटनेचे अध्यक्ष दिपक छाजेड, उपाध्यक्ष इक्बाल शेख, सचिव परशुराम पोटे, सहसचिव निलेश चौधरी, कोषाध्यक्ष प्रविण शर्मा यांच्यासह ज्ञानेश्वर बोनगीनवार, विशाल ठोंबरे, नरेंद्र लोणारे, महादेव दोडके, मारोती मडकाम, पुरुषोत्तम नवघरे, संजय चिंचोलकर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();