टॉप बातम्या

धरतीआबा क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत भाजपमध्ये भव्य प्रवेश

सह्याद्री चौफेर : योगेश मडावी 

झरी जामणी : तालुक्यातील माथार्जून- येथे महामानव क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोतकुलवार यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर शिवाजी चौकात जाऊन स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी भगवान बिरसा मुंडा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर करत समाजहित व राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

त्यानंतर आयोजित कार्यक्रमात उभाठा गट तसेच काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी आमदार संजीवरेड्डी बोतकुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क अभियानाचा जयघोष करण्यात आला. उपस्थितांनी पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत विकासाभिमुख कार्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();