सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव पोलीस ठाण्यात प्रशासकीय बदल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर दानडे यांनी नवीन ठाणेदार म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे.
सागर दानडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मारेगाव तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे तसेच अवैध धंद्यांविरोधात प्रभावी कारवाई करणे याकडे विशेष लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मारेगाव तालुक्यात विविध सामाजिक, राजकीय व नागरिक स्तरातून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत असून जनतेशी समन्वय साधत लोकाभिमुख पोलिसिंगला प्राधान्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, माजी ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दलही अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

