टॉप बातम्या

आषाढी एकादशी उत्सव उत्साहात साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : स्थानिक आंबेडकर चौकातील नवदुर्गा मंदिराच्या शेजारील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी जगन्नाथ मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष संजय खाडे यांच्या हस्ते पूजन झाले. नवदुर्गा मंदिराचे अध्यक्ष रवी बेलूरकर, दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, चंदन मोहुरले यांनी त्यांचे स्वागत केले. महाआरतीनंतर फराळाचे वितरण करण्यात आले. 

शेकडो वर्ष जुने असलेले हे विठ्ठल मंदिर आहे. हेमाडपंती शैलीत मंदिराचे बांधकाम असून 1921 साली त्याचा सभामंडप बांधण्यात आला. 

नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के, अनिल अक्केवार, लक्ष्मण उरकुडे, अर्जुन उरकुडे, दीपक दिकुंडवार यांसह अनेक मान्यवरांनी विठ्ठल दर्शन घेतले. या आयोजनाची बाजू अविनाश कामटकर, राजकुमार अमरवाणी मारुती गोखरे, नितीन बिहारी, स्वप्निल बिहारी, नितीन मसेवार, पुरुषोत्तम मांदाडे, नीरज लोणारे, संजय लोणारे, दीपक हांडे, रितेश सानेकर, धम्मा मनवर, राजू जयस्वाल, अमोल बदखल यांनी सांभाळली. संचालन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. आभार शिवा आसुटकर यांनी मानले. 

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();