टॉप बातम्या

शेतकऱ्यांच्या हितासाठी अविनाश लांबट आक्रमक; महावितरणला निवेदन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कपाशीसह विविध पिकांची पेरणी झाल्यानंतरही अपेक्षित पाऊस न झाल्याने सिंचनाची गरज निर्माण झाली आहे. मात्र नियमित वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना विहीर व बोअरवेलद्वारे पाणी देणे कठीण होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात वीज मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शेतीपंपांना नियमित व अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी अविनाश लांबट यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर भाजप कायम ठामपणे उभी आहे. महावितरणने त्वरित सकारात्मक कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकरी व नागरिकांना सोबत घेऊन मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

निवेदन देताना माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे, शोभा नक्षणे, माला गौरकार, पवन ढवस, विजय खिरटकर, दीपिका रस्से, मारोती गौरकार, गणेश खुसपुरे, मंजुषा बोढाले, गणपत वऱ्हाटे, दादाराव ठोबरे, सुभाष खडसे, दत्तू लाडसे, रामचंद्र जवादे, शंकर रस्से, धनंजय बोढाले,विठ्ठल दानव,सुमित जुनगरी, अतुल खिरटकर, विजय क्षीरसागर, प्रकाश रस्से,संजय देवतळे, स्वप्नील कडू आदी हजर होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();