टॉप बातम्या

मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेला वेग; भाजपच्या बूथ प्रमुखांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भारतीय जनता पक्षाच्या वतीने मतदार यादी शुद्धीकरण (SIR) मोहिमेच्या अनुषंगाने मारेगाव ग्रामीण व मारेगाव शहरातील बूथ प्रमुख (BLA-2) यांची महत्त्वपूर्ण बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगाव येथे पार पडली. या बैठकीत मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नव्या मतदारांची नोंदणी, मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आदी बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

वणी विधानसभा प्रमुख (BLA-1) रवींद्र बेलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप तालुका अध्यक्ष तथा मारेगाव मंडळ संयोजक अविनाश लांबट यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी संकेत तंबाखे (वणी विधानसभा को-ऑर्डिनेटर, SIR) यांनी बूथ प्रमुखांना मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेचे महत्त्व समजावून सांगत प्रत्येक बूथवर काटेकोरपणे काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थित बूथ प्रमुखांना संघटनात्मक जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यात आली तसेच मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीला मारेगाव शहर व ग्रामीण भागातील बूथ प्रमुखांची लक्षणीय उपस्थिती होती.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();