टॉप बातम्या

शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचा 60 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा 60 वा वर्धापन दिन वणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील साईबाबा मंदिर चौकातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ तसेच शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पक्षाच्या 60 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा व समाजकारणातील योगदानाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया, दीपक कोकास, आशिष खुलसंगे (राजे), किशोर नांदेकर, शुभम गोरे, कपील कुंटलवार, सचिन पडोळे, जयदीप नांदेकर, भाग्यश्री वैद्य, सौ. पुरी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();