टॉप बातम्या

सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी उत्तमरावजी कुमरे यांचे निधन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील सिद्धिविनायक रेसिडेन्सी परिसरातील रहिवासी तथा सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी उत्तमरावजी शंकरराव कुमरे (वय ८४) यांचे गुरुवारी (दि. २५) सकाळी ८.३० वाजता दीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले.

उत्तमरावजी कुमरे यांनी ग्राम विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असताना ग्रामीण विकास, जनजागृती आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि सेवाभावी कार्यपद्धतीमुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. निवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग कायम होता.

त्यांच्या पश्चात पाच मुली, एक मुलगा, जावई, सून, नातवंडे व आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे. ते श्री रंजीत उत्तमराव कुमरे यांचे वडील होत.

त्यांच्या निधनाची बातमी कळताच नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने कुमरे कुटुंबावर तसेच परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी ४ वाजता सिद्धिविनायक रेसिडेन्सी येथील राहत्या घरून निघणार असून मोक्षधाम, वणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्व. उत्तमरावजी कुमरे यांच्या निधनाने एक कर्तव्यदक्ष, शांत व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();