सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशाच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा निर्णय, हरितक्रांतीला मिळालेले प्रोत्साहन अशा महत्त्वपूर्ण घडामोडींमध्ये त्यांची भूमिका राहिली. गरीब, शेतकरी आणि वंचित घटकांच्या विकासासाठी त्यांनी विविध धोरणांवर भर दिला. त्यांच्या नेतृत्वाचा, निर्णयांचा आणि कार्याचा ठसा भारतीय इतिहासात कायम राहणार असून, स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा उजाळा देण्यात आला.
यावेळी राहुल माणिकराव ठाकरे, तेजराज बोढे, अशोक चिकटे, प्रफुल उपरे, विवेक मांडवकर, राजू टोटावार, उत्तम पाटील गेडाम, विक्की पानघाटे, घनश्याम पावडे, प्रमोद वासेकर, प्रेमानंद मंगाम, राजू अंकतवार आणि ईश्वर खाडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

