टॉप बातम्या

वरोडी सहकारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी नंदकुमार मस्के यांची एकमताने निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

महागाव : वरोडी येथील सहकारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी नंदकुमार रुस्तुमराव मस्के यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यासह वरोडी परिसरात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

सहकारी संस्थेचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख व्हावे, संस्थेच्या प्रगतीसाठी योग्य नियोजन व निर्णयप्रक्रियेला चालना मिळावी, तसेच सभासदांच्या हिताच्या दृष्टीने विविध विषयांवर अनुभवाधारित मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सहकार क्षेत्रातील ज्ञान, अनुभव आणि प्रशासकीय कौशल्य असलेल्या व्यक्तीची तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती केली जाते. याच पार्श्वभूमीवर वरोडी सहकारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी नंदकुमार मस्के यांची एकमताने निवड करण्यात आली.

त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा सोसायटीच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल, तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मस्के यांची एकमताने झालेली निवड ही त्यांच्यावरील विश्वासाचे प्रतीक मानली जात आहे. या निवडीबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ व हितचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व सहकार क्षेत्रातील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();