सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : गीत घोष हे दलित, आदिवासी, कष्टकरी, शोषित सर्वहारा वर्गाच्या हक्काचे लढाईतील क्रांतिकारी विचारधारेचे नेते असून ते लढवय्ये सैनिक आहे, असे मत माजी शिक्षणाधिकारी मा.उत्तमरावजी गेडाम यांनी गीत घोष यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपले प्रमुख मार्गदर्शक म्हणून मत व्यक्त केले.
हा वाढदिवसाचा छोटेखांनी कार्यक्रम आदिवासी सोशल फोरम वणी, इतर आदिवासी संघटना यांच्या पुढाकाराने विसावा हाँटेलमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गटविस अधिकारी मा.रामदासजी गेडाम सर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक मा.उत्तमरावजी गेडाम सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी सो.फो.चे अध्यक्ष मा.रमेशजी मडावी, मा.श्रीकृष्ण मडावी, मा.कैलाजी मेश्राम, मा.संतोषजी चांदेकर, प्रकाशजी सिडाम, प्रशांत डोणेकर यांनीही गीत घोष यांच्या वाढदिवसानिमित्त गीत घोष यांच्या आजपर्यंतच्या चळवळींचा व संघर्षाचा आडावा घेत त्यांच्या दिर्घ आयुष्याची कामना आपल्या भाषणातून व्यक्त केलीत.
या वाढदिवस सोहळ्याचे प्रास्ताविक मा. अजयजी राजगडकर यांनी केले मा.वसंतराजी चांदेकर सर यांनी संचालन केले.सत्काराला उत्तर देताना मा.गीत घोष यांनी सांगितले की,आपण बॅनर वर झळकणारी लोक नसलो तरी या व्यवस्थेच्या छाताडात धडकी भरवून धडकणारे लोक नक्कीच आहोत हे आपण विसरू नका आपसांत कितीही मतभेद असले तरी आपसांत संवाद असणे काळाची गरज आहे, कारण आपण समाजाचे समजदार चेहरे आहोत आणि समाजाला चेहरा विद्रूप करणारी व्यवस्था आज आपल्या समोर आव्हान बनून उभी आहे, हे आपण विसरता कामा नये. आपण माझा वाढदिवस अशा वैचारिक चिंतनाने साजरा केला आहे त्यामुळे मी आपला नक्कीच ऋणी आहे आणि मी आपला आदिवासी समाज संघटित व एकसंध करण्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिल, या शब्दात बोलून आपला वाढदिवस साजरा करणा-या लोकांची गीत घोष यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार मानले. या कार्यक्रमास भगवानभाऊ आत्राम, महेश आत्राम, सुभाष चांदेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.