सह्याद्री चौफेर |ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोटोणी परिसरातील गावामध्ये बारमाही आरोग्यविषयक समस्यांचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतात. त्यामुळे बोटोणी परिसरातील गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) देण्यात यावे, यासाठी बोटोणी येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय देरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
चार शाळा, पाच उपकेंद्र छोटया मोठ्या गावांचे बाजारपेठ बोटोणी येथे आहेत. पूर्ण गावे पेसा अंतर्गत गावे आहेत.मात्र, परिसरातील अनेक गावे मार्डी प्राथमिक केंद्राला जोडलेली आहेत. तेथे जाण्यासाठी येथील नागरिकांना तालुका ओलांडून शेवटच्या टोकाला जावे लागत असून बोटोणी परिसरात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने यासाठी सन 2010 पासून प्रशासनाकडे मागणी केली जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्षित होत असल्यामुळे परत सोमवार दि. 23 जून रोजी आमदार देरकर यांच्याशी 100 टक्के प्रयत्न करण्यासाठी चर्चा केली.
यावेळी बोटोणी येथील सरपंच प्रवीण वनकर, ग्राम. सदस्य मंगेश उईके, महादेव सिडाम, दिलीप उईके आदी उपस्थित होते.