टॉप बातम्या

भीषण अपघातात तरुण ठार,वणी-वरोरा महामार्गवरील घटना

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : आज सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास एका दूचाकीस्वाराला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची दुर्दैवी घटना वणी-वरोरा महामार्गांवरील संविधान चौकात घडली. गणेश हरिदास बदकी (वय 29) रा.वार्ड नं 2,मारेगाव रोड असे त्याचे नाव आहे.
गणेश बदकी हा चंद्रपूर येथे जेवणाचा डबा पोहचवून वरोरा मार्गे परतत असताना त्याच्या दुचाकी क्र.(MH 29,AB 1563) ला वणी-वरोरा महामार्गावरील संविधान चौकात मालवाहू ट्रक क्र. (CG 04 PH 0520) नी जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात दुचाकीस्वार गणेश जागीच ठार झाला आहे. अपघात झाल्यानंतर वाहन चालक हा वाहनासह पोलिस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला.
अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. गणेश यांच्या पश्चात आई वडील व एक बहीण असा आप्त परिवार आहे. 

सदर घटनेचा प्राथमिक तपास जमादार संतोष आढाव करीत आहे.
Previous Post Next Post