सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने तथा शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार तसेच शिव वाहतूक सेना अध्यक्ष उपनेते मा. भाऊ कोरगांवकर यांच्या सूचनेनुसार अजिंक्य शेंडे यांची शिवसेना अंगीकृत संघटना शिव वाहतूक सेनेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर सोपविलेल्या पदाचा संघटनात्मक जबाबदारीचा मी वाहतूकदारांच्या न्याय हक्कांसाठी आणि त्यांचे प्रश्न - समस्या सोडविण्यासाठी यथायोग्य प्रयत्नशील करणार असल्याचे अजिंक्य शेंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. श्री.शेंडे यांनी केलेल्या व्यापक कार्याची दखल घेत पक्ष प्रमुखांनी सहमती दिल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार शिव वाहतूक सेनेचे उपनेते भाऊ कोरगावकर यांनी प्रजासत्ताक दिनी शिवसेना प्रणित शिव वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष यवतमाळ पदी अजिंक्य शेंडे यांची निवड केल्याचे नियुक्तीचे पत्र सरचिटणीस निलेश भोसले यांच्या स्वाक्षरीने दिले.
त्यांच्या नियुक्तीने शहर वाहतूक चालक मालक वर्ग तसेच वणी उपविभागीय क्षेत्रातील वाहक संघटनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदनसह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अजिंक्य शेंडे यांची नियुक्ती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 05, 2025
Rating: