इसमावर कुर्‍हाडीने हल्ला

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : तालुक्यातील भुरकी येथे इसमावर कुर्‍हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी शेतीचे काम आटोपुन घराकडे येत असतांना शेतीचे जुने भांडणाच्या कारणातुन शालीक नानाजी भोयर यांना कुर्‍हाडीने तसेच काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना १७ ऑक्टोंबर ला घडली. याप्रकरणी अक्षय शालीक भोयर यांच्या तक्रारीवरून श्रीराम कृष्णाजी बदकी व अधिक तिघाविरूध्द गुन्हा नोंद केला.

नरसाळा येथे शांततेत दुर्गा देवीचे विसर्जन

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मारेगाव : मौजे नरसाळा येथे दुर्गा देवी विसर्जन मोठ्या उत्सहात व अत्यन्त शांततेत पार पडले. हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत दुर्गा मातेचा निरोप घेतला, यावेळी आदिवासी गोंडी ढेमसा नृत्यावर मिरवणुक काढण्यात आली. आई एकविरा दुर्गा उत्सव मंडळ नरसाळा यांच्या वतीने या मिरवणूकी दरम्यान शिस्त आणि शांतता राखत या वर्षीचे दुर्गा विसर्जन शांततेत संपन्न झाले.


देवस्थान समितीची शेतजमीन परस्पर विक्री केल्याचा आरोपावर पत्रकार परिषदेत संजय देरकर यांचं स्पष्टीकरण

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : सदगुरु जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन मे. बी.एस. इस्पात लि. या कोळसाखान करीता परस्पर विक्री केल्याचा बंडू देवाळकर यांनी पत्रपरिषदेतून केलेला आरोप धादांत खोटा असून एखाद्याच्या स्वच्छ प्रतिमेला दाग लावण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. यामागे राजकीय षडयंत्र असून त्याचा "बोलविता धनी" कुणी तरी वेगळाच आहे. राजकीय कुरघोडीतुन अशा प्रकारे लांछण लावण्याचे कुटील प्रयत्न सुरु झाले आहेत. 

जगन्नाथ महाराज संस्थानच्या नावाने धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेली ही शेत जमीन त्यांची रीतसर परवानगी घेऊनच विक्री करण्यात आली आहे. तसेच जगन्नाथ महाराज देवस्थान समितीचा ठराव घेऊन व ठराव बुकात नोंदणी करून हा व्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे जगन्नाथ महाराज संस्थानच्या नावे असलेली शेतजमीन आर्थिक हव्यासापोटी परस्पर विक्री केल्याचा हेतुपुरस्सरपणे करण्यात आलेला आरोप बिनबुडाचा असल्याचे स्पष्टीकरण संस्थानचे विश्वस्त संजय देरकर यांनी (ता.१७ ) ऑक्टोंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून माध्यमांना दिले. 

जगन्नाथ महाराज संस्थानची जमीन बी,एस. इस्पात लि. या कंपनीला परस्पर विकून संजय देरकर यांनी आपला आर्थिक फायदा करून घेतल्याचा तथ्यहीन आरोप बंडू देवाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्यावर स्पष्टीकरण देण्याकरिता संजय देरकर यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन या आरोपाचे पूर्णपणे खंडण केले आहे. झरी (जामणी) तालुक्यातील रुईकोट येथील जगन्नाथ महाराज संस्थान वेगाव च्या नावे रजिस्टर असलेली ही पाच एकर शेतजमीन सन १९७४ साली रामलू उर्फ रामन्ना बकन्नाजी मंदावार यांनी वणी रजिस्टर कार्यालयात बक्षिस पत्राद्वारे संस्थानला दान दिली. त्यानंतर १९८६ साली संस्थानच्या वतीने धर्मदाय आयुक्ताकडे या शेत जमिनीची नोंदणी करण्यात आली. 

१९८६ पासून जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावे ही शेतजमीन रजिस्टर असून तशी सातबाऱ्यावर नोंद देखील आहे. दरम्यान मे. बी. एस. इस्पात लि. या कंपनीने कोळसाखान करीता येथील शेत जमिनी अधिग्रहित केल्या. मात्र, सर्वे नंबर ४९/५ मधील २.२ हेक्टर असलेली ही शेत जमीन जगन्नाथ महाराज संस्थानच्या नावे रजिस्टर असल्याने ती अधिग्रहित होणे बाकी होते. त्यामुळे कोळसा कंपनी वारंवार या शेत जमिनी बाबत पाठपुरावा करीत होती. त्याकरिता २५ जानेवारी २०२४ रोजी धर्मदाय आयुक्त अमरावती यांच्याकडे या शेत जमिनीच्या विक्री बाबत परवानगी मिळण्याकरिता देवस्थान समिती कडून अर्ज सादर करण्यात आला. त्यानुसार १९ सप्टेंबर २०२४ रोजी शेत जमीन विक्री करण्याकरिता धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी मिळाली. ही सर्व प्रक्रिया नियमानुसार करण्यात आली. शेत जमीन खरेदी विक्रीचे सर्व व्यवहारही पारदर्शकपणे झाले आहेत. 

जगन्नाथ महाराज संस्थानच्या खात्यातच ही सर्व रक्कम जमा होणार आहे. त्यातून दुसरीकडे शेत जमीन घेऊन सदगुरु जगन्नाथ महाराज यांचं देवस्थान बांधण्यात येणार आहे. मंदावार यांनी दान केलेल्या शेत जमिनीचे ट्रस्टी म्हणून मंदावार कुटुंबातील सदस्यच जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळे जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावे रजिस्टर असलेली शेत जमीन परस्पर विक्री केल्याचा माझ्यावर करण्यात आलेला आरोप धादांत खोटा असल्याचे स्पष्टीकरण संजय देरकर यांनी पत्रपरिषदेतून दिले आहे.

मार्डी येथे दुर्गा विसर्जन शांततेत संपन्न,हजारोंच्या उपस्थितीत आई भवानीचा घेतला निरोप

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मारेगाव : सर्वधर्म समभाव असलेली मार्डी झेंडा चौक येथील आई भवानी चे मंगळवारी पारंपरिक थाटात दुर्गा विसर्जन मोठया उत्सहात व अत्यन्त शांततेत पार पडले.

गावातील तसेंच परिसरातील हजारों भाविकांच्या उपस्थितीत येथील मातेचा निरोप घेतला.यावेळी गावातील मुख्यमार्गाने दुर्गा देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली, गेल्या वीस वर्षांपासून जी मारेगाव तालुक्यातील रेकॉर्ड ब्रेक म्हणून ओळखली जाते.

प्रत्येक वर्षी या मिरवणुकीत लांबून बँड, डीजे चा सहभागी होत असतात,त्यामुळे मार्डीतील जय भवानी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे विसर्जन विशेष आकर्षण ठरते. 

जय भवानी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाने पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले, ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मिरवणुकीदरम्यान शिस्त आणि शांतता राखणे यासाठी मंडळाने स्वतःची जबाबदारी स्वीकारली होती, ज्यामुळे या वर्षीचे दुर्गा विसर्जन यशस्वी आणि शांततेत पार पडले.

HAPPY BIRTHDAY: सुरज गमे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सुरजराव...
आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. "आई तुळजा भवानी" आपणास उदंड आयुष्य देवो, भाऊसाहेब...या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, हीच शुभेच्छा !

जन्मदिनाच्या अगणित शुभेच्छा...!

शुभेच्छुक :- सुरज गमे मित्र परिवार