सह्याद्री चौफेर | वृतसंस्था
मारेगाव : मौजे नरसाळा येथे दुर्गा देवी विसर्जन मोठ्या उत्सहात व अत्यन्त शांततेत पार पडले. हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत दुर्गा मातेचा निरोप घेतला, यावेळी आदिवासी गोंडी ढेमसा नृत्यावर मिरवणुक काढण्यात आली. आई एकविरा दुर्गा उत्सव मंडळ नरसाळा यांच्या वतीने या मिरवणूकी दरम्यान शिस्त आणि शांतता राखत या वर्षीचे दुर्गा विसर्जन शांततेत संपन्न झाले.