टॉप बातम्या

मार्डी येथे दुर्गा विसर्जन शांततेत संपन्न,हजारोंच्या उपस्थितीत आई भवानीचा घेतला निरोप

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मारेगाव : सर्वधर्म समभाव असलेली मार्डी झेंडा चौक येथील आई भवानी चे मंगळवारी पारंपरिक थाटात दुर्गा विसर्जन मोठया उत्सहात व अत्यन्त शांततेत पार पडले.

गावातील तसेंच परिसरातील हजारों भाविकांच्या उपस्थितीत येथील मातेचा निरोप घेतला.यावेळी गावातील मुख्यमार्गाने दुर्गा देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली, गेल्या वीस वर्षांपासून जी मारेगाव तालुक्यातील रेकॉर्ड ब्रेक म्हणून ओळखली जाते.

प्रत्येक वर्षी या मिरवणुकीत लांबून बँड, डीजे चा सहभागी होत असतात,त्यामुळे मार्डीतील जय भवानी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे विसर्जन विशेष आकर्षण ठरते. 

जय भवानी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाने पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले, ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मिरवणुकीदरम्यान शिस्त आणि शांतता राखणे यासाठी मंडळाने स्वतःची जबाबदारी स्वीकारली होती, ज्यामुळे या वर्षीचे दुर्गा विसर्जन यशस्वी आणि शांततेत पार पडले.
Previous Post Next Post