माथार्जुन ग्रामपंचायत कार्यालयात शिक्षकांची सभा संपन्न

सह्याद्री चौफेर| योगेश मडावी

झरी : आज दिनांक 23 जून 2025 रोजी माथार्जुन ग्रामपंचायत येथे शाळा चालू झाल्या निमित्ताने सर्व शिक्षकांची सभा आयोजित केली होती.

सभेमध्ये संपूर्ण शिक्षक हजर होते माननीय सरपंच श्री रवींद्र कायतवार यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना विनंती सूचना देण्यात आल्या की विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक व गुणवत्ता वाढली पाहिजे व आपल्या त्यांना चागल्या प्रकारचे आहार शाळेमध्ये देण्यात यावे व शाळेमध्ये कोणत्याही साहित्य भांडार यांची कमतरता असल्यास ग्राम पंचायतला सुचवावे सरपंच या नात्याने आपल्या शाळेला साहित्य भांडार पुरवण्याचा प्रयत्न करीन असे सांगिले. 

शिक्षकांनी आपल्या शाळेच्या साहित्या भंडारा विषयी माहिती दिली व या सभेमध्ये उपस्थित शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अविनाश मोरे सर. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य चिंतावार सर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय शहारे सर, टिंगणे सर,संपूर्ण जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विलास किनाके सर,नानू मेश्राम सर, राजू सिडाम सर, चव्हाण सर, धोटे सर,व अंगणवाडी सेविका लता सिडाम,संगीता मेटकर, पुणेश्वरी कुमरे, कोहचाडे मॅडम, तंटामुक्ती अध्यक्ष नागोरावजी दडांजे,सामाजिक कार्यकर्ता शफिभाई शेख, मा.श्री.सरपंच यांचे स्वीय सहाय्यक तथा पत्रकार योगेश मडावी हे उपस्थित होते.

विजय बाबु चोरडिया मित्र परिवारातर्फे वरून राजाला साकडे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : कपाशीची लागवड अन् सोयाबीनच्या बहुतांश पेरण्या आटोपल्या असून शेतकऱ्यांना सध्या पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाच्या आगमनासाठी शेतकरी वरुणराजाकडे आर्तहाक घालत असल्याचे दिसून येते. यातच वणी शहरातील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते श्री विजय चोरडिया यांनी आज रविवारी सकाळी ११ वाजता 'देवाकडे साकडे घातले की बळीराजाला सुखी समाधानी ठेव.' यासाठी शहरातील मोठी कमान चौक येथील आपल्या पारसमल प्रेमराज या प्रतिष्ठान समोर नागरिकांना मसाला चने वाटप केले आहे.

गेल्या सात ते आठ दिवसाआधी झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी, तूर आणि सोयाबीनच्या पेरण्या उरकल्या. परंतु तेव्हापासून अचानक पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. ज्यांच्याकडे ओलीताची सोय आहे ते शेतकरी कसेबसे पीक वाचवण्यासाठी धडपडत आहे, तर दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त ही वरुणराजावरच आहे. त्यामुळे रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी रविवारी मसाला चने वाटप करुन वरुणराजाकडे पावसासाठी एकप्रकारे साकडेचं घातले.

आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात वणी येथे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. याच अनुषंगाने भारत स्वाभीमान, महिला पतंजली योग समिती यांचे तर्फे अकरावा आंतरराष्ट्रीय योगदिन एसबी लॉन वणी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व सामाजिक कार्यकर्त्या सौ.किरणताई देरकर यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
   

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रोटोकॉलनुसार प्रार्थना, शरीर संचलन,विविध प्रकारची 15 आसने, कपालभाती , विविध प्राणायाम, ध्यान यावेळी घेण्यात आले.

प्रास्तावीकेतुन शासनाच्या दहा कार्यक्रमाची माहिती देऊन प्रा.महादेव खाडे यांनी योग दिनाच्या प्रोटोकॉल नुसार कार्यक्रमाचे संचालन केले तर, योग शिक्षक लक्ष्मण इद्दे, रमेश बोबडे, जयप्रकाश राजुरकर सौ.माया माटे, विद्या दहेकर, वनिता क्षिरसागर यांच्या आदर्श प्रात्यक्षिकातून उपस्थित योगसाधकांनी प्रात्यक्षिक केले.

यावेळी झालेल्या योग दिन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सौ.ममता श्रीवास्तव , सौ.कुंदा सावसाकडे व सौ.माया माटे यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली महिलांनी देशप्रेम, सिंदुर ऑपरेशन वर आधारीत योगनृत्य सादर केले. तर सौ.रेखा बोबडे व सौ.सुषमा मोहितकर यांनी 'साॅसो क्या भरोसा' हे मार्मिक गीत गायन केले.

संकल्प वाचन श्री.दिगंबरराव गोहोकर यांनी करुन श्री.वसंतराव उपरे यांनी शांतीपाठ घेतला. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन सौ.स्वप्ना पावडे यांनी केले व आभारप्रदर्शन श्री.नामदेवराव जेनेकर यांनी केले. यावेळी योग दिन कार्यक्रमास हजर राहुन वणी शहरातील अनेक योगसाधक व विद्यार्थी यांनी यांचा सहभाग घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियमित सर्व योग शिक्षक व योग साधकांनी उत्स्फूर्तवर्धक सहकार्य केले.

धामणी शेत शिवारात गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यात आत्महत्याची धग कायम दिसून येत आहे, नवरगाव धरण येथील घटना ताजी असताना आता धामणी येथे एका व्यक्तीने शेतात गळफास लावून आत्महत्या केली. आज शनिवार ला सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

श्रीराम आत्माराम शिवरकर (55) रा.धामणी, असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.त्यांनी गावातीलच एका शेतकऱ्याच्या शेतात गळफास घेतला. 

श्रीराम हे गेल्या अनेक दिवसापासून आजारपणात होते,ते नागपूर तर कढी सावंगी (मेघे) येथे उपचार घेत असल्याचे समजते. ते आजाराने त्रस्त असल्याने त्यांनी जीवनाचा शेवट केला असावा असा कयास लावला जात आहे.

मात्र,श्रीराम यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप तरी अस्पष्ट आहे. घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आला. मृतकाच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार असून पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.

अज्ञात वाहणाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. ही घटना आज शनिवारी सकाळी साडेसहा वा. सुमारास वणी-कायर मार्गांवर घडली. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अमर रतन करसे (अं. वय 45) रा. सेवानगर ता, वणी असं अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अमर करसे हे झरी (जामणी) रुग्णालय येथे कर्मचारी म्हणून कार्यरत होते, ते कर्तव्य आटपून घरी परतत असतांना वणी-कायर मार्गांवरील एका बिअर बार जवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चक्क्याखाली चिरडून भीषण अपघात झाला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने करसे कुटुंबियावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. 

 मृतक अमर त्यांच्या पाठीमागे पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.पोलिस या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहे.