टॉप बातम्या

आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात वणी येथे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. याच अनुषंगाने भारत स्वाभीमान, महिला पतंजली योग समिती यांचे तर्फे अकरावा आंतरराष्ट्रीय योगदिन एसबी लॉन वणी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व सामाजिक कार्यकर्त्या सौ.किरणताई देरकर यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
   

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रोटोकॉलनुसार प्रार्थना, शरीर संचलन,विविध प्रकारची 15 आसने, कपालभाती , विविध प्राणायाम, ध्यान यावेळी घेण्यात आले.

प्रास्तावीकेतुन शासनाच्या दहा कार्यक्रमाची माहिती देऊन प्रा.महादेव खाडे यांनी योग दिनाच्या प्रोटोकॉल नुसार कार्यक्रमाचे संचालन केले तर, योग शिक्षक लक्ष्मण इद्दे, रमेश बोबडे, जयप्रकाश राजुरकर सौ.माया माटे, विद्या दहेकर, वनिता क्षिरसागर यांच्या आदर्श प्रात्यक्षिकातून उपस्थित योगसाधकांनी प्रात्यक्षिक केले.

यावेळी झालेल्या योग दिन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सौ.ममता श्रीवास्तव , सौ.कुंदा सावसाकडे व सौ.माया माटे यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली महिलांनी देशप्रेम, सिंदुर ऑपरेशन वर आधारीत योगनृत्य सादर केले. तर सौ.रेखा बोबडे व सौ.सुषमा मोहितकर यांनी 'साॅसो क्या भरोसा' हे मार्मिक गीत गायन केले.

संकल्प वाचन श्री.दिगंबरराव गोहोकर यांनी करुन श्री.वसंतराव उपरे यांनी शांतीपाठ घेतला. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन सौ.स्वप्ना पावडे यांनी केले व आभारप्रदर्शन श्री.नामदेवराव जेनेकर यांनी केले. यावेळी योग दिन कार्यक्रमास हजर राहुन वणी शहरातील अनेक योगसाधक व विद्यार्थी यांनी यांचा सहभाग घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियमित सर्व योग शिक्षक व योग साधकांनी उत्स्फूर्तवर्धक सहकार्य केले.
Previous Post Next Post